भाग 2

भाग 2

जुलीयेट जुलीयेट जुलीयेट....


रंगमंच सजला...
प्रेक्षक तयार होते...
सहकारी कलाकार  सज्ज होते....
शेवटी जुलीयेट....
मेकअप करून बॅक स्टेज वर आली......
पुजाच पुट पुट चालूच होत...
"तरी मी बोलत होते माझ कोण ऐकत म्हणा...
मला रोल द्या म्हटले तर दिला.... "प्रॉम्प्ट" चा..."
जुलीयेट ला बघून सहकलाकार खुश झाले...
तस बघायला गेलं तर पूजा नकोच होती कोणाला...
तरी किरकिर करते म्हणून तिला खुश करण्यासाठी स्क्रिप्ट हातात टेकवली होती...
         पहिली घंटा झाली....
धड धड वाढत होती....
तशी पहिलीच वेळ नव्हती पण ह्या रोल साठी खूप घासा घीस करावी लागली होती...
राजकारण, भांडण, वाद ,वोटिंग
आणि शेवटी ऑडिशन सगळीकडे वरचढ राहून जीवाचा आटापिटा केला
न शेवटी ठरलं जुलीयेट...
ह्या रोल ला न्याय द्यायचा होता...
एकही चूक महागात पडणार होती
"टोमणे ऐकावे लागतील हसू होईल...
नाही नाही असं काही होऊच द्यायचं नाही...
आई एम द बेस्ट मी करून दाखवणारच"

          दुसरी घंटा झाली.....
सर्व कलाकार सज्ज झाले...
 एकमेकांना शुभेच्छा देत प्रत्येकाने आपापले डायलॉग आठवले...
ती शांत डोळे मिठुन उभी होती
तिला फक्त तिचा बेस्ट द्यायचा होता
तिने वरती एकदा पाहिलं आणि हात जोडले एक जोराचा श्वास घेतला..
        
     तिसरी घंटा झाली....
पडदा वर गेला.....
टाळ्यांचा कडकडाट.....
एक एक पात्र उलगडत  गेले....
रोमिओ आणि जूलीयेट..
प्रेक्षकांना चांगलेच भावले....
           पडदा पडला....
टाळ्यांचा कडकडाट.....
"जुलीयेट जुलीयेट जुलीयेट"....
हॉल दणाणून निघाला.....
जुलीयेट ला मिळालेला प्रतिसाद पाहून...
पूजा चा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
विचार केला होता त्यापेक्षा जास्त यश मिळाल्याच समाधान सर्व कलाकार आणि पडद्या मागील सहायकाना मिळालं होतं....
प्रेक्षक आणि परीक्षक दोघांचा चांगला प्रतिसाद...

दिग्दर्शक तर जणू कोलांट्या उड्याच मारत होता...

लेखक तर ऑस्कर जिंकल्याचा अविर्भावात स्क्रिप्ट हातात घेऊन  फिरत होता...

प्रत्येकाला अस झालं होतं की कोणाला मिठी मारू न कोणाला नको..

ह्याच गर्दीत काही जणांनी आपल्या क्रश ला मिठी मारून घ्यायचं स्वप्न पूर्ण करून घेतलं होतं...

बस अजून काय हवं एका कलाकाराला....
सगळे आनंदात....
मेकअप रूम मध्ये....
जुलीयेट...चांगकीच सुखावली होती....
तिला आता आभाळ ठेंगण वाटत होतं...
आता फक्त एकच नाव जुलीयेट जुलीयेट जुलीयेट...
जो तो येऊन नाईस रोल हा..."जुलीयेट"
अप्रतिम हा "जुलीयेट"...
मजा आगया "जुलीयेट"....
आता ती सर्वांसाठी "जुलीयेट" झाली होती...
राहून राहून का होईना नाईलाजाने शेवटी पूजा आली....
"छान रंगला खेळ आवडलीस तू लोकांना..."
"जुलीयेट''
तिने हसत हसत विचारलं "आणि तुला..??"
"माझं काय मी कोण सांगणारी..सगळ्याना आवडलं म्हणजे झालं की..."
आणि ती निघून गेली..
ती अशीच आहे सगळ्याना माहीत असल्याने कोणी एवढं लक्ष दिलं नाही..
पण जुलीयेट आता वेगळ्याच विश्वात होती..
तिलाही कुठे तरी खरच जुलीयेट असल्याचा भाव येत होता...
झग्याचा घोळ हातात धरून जुलीयेट सारख्या गिरख्या मारायला तिला जणू मज्जाच वाटत होती....
ती स्वतःच अस्तित्व विसरून जुलीयेट च्या विश्वात निघाली होती...
तेवढ्यात पूजा आली.
"ओ जुलीयेट मॅम झालं आता आवरून निघायच आहे सगळे वाट पाहतात ग्राउंड वर"
जुलीयेट सावरली...
हलकीशी हसत ती बाहेर पडली आणि ग्राउंड कडे निघाली....
कानात फक्त तेच आवाज येत होते...
"जुलीयेट जुलीयेट जुलीयेट"

क्रमशः

©-श्रीकांत कुंभार

टिप्पण्या

  1. youtube 【Link Vào Trang Chủ_SODO66.PH】
    youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube to mp3 converter samsung youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube youtube.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सायकल वाला....