पोस्ट्स

भाग 2

भाग 2 जुलीयेट जुलीयेट जुलीयेट.... रंगमंच सजला... प्रेक्षक तयार होते... सहकारी कलाकार  सज्ज होते.... शेवटी जुलीयेट.... मेकअप करून बॅक स्टेज वर आली...... पुजाच पुट पुट चालूच होत... "तरी मी बोलत होते माझ कोण ऐकत म्हणा... मला रोल द्या म्हटले तर दिला.... "प्रॉम्प्ट" चा..." जुलीयेट ला बघून सहकलाकार खुश झाले... तस बघायला गेलं तर पूजा नकोच होती कोणाला... तरी किरकिर करते म्हणून तिला खुश करण्यासाठी स्क्रिप्ट हातात टेकवली होती...          पहिली घंटा झाली.... धड धड वाढत होती.... तशी पहिलीच वेळ नव्हती पण ह्या रोल साठी खूप घासा घीस करावी लागली होती... राजकारण, भांडण, वाद ,वोटिंग आणि शेवटी ऑडिशन सगळीकडे वरचढ राहून जीवाचा आटापिटा केला न शेवटी ठरलं जुलीयेट... ह्या रोल ला न्याय द्यायचा होता... एकही चूक महागात पडणार होती "टोमणे ऐकावे लागतील हसू होईल... नाही नाही असं काही होऊच द्यायचं नाही... आई एम द बेस्ट मी करून दाखवणारच"           दुसरी घंटा झाली..... सर्व कलाकार सज्ज झाले...  एकमेकांना शुभेच्छा देत प्रत्येकाने आपापले डायलॉग आठवले... ती शांत डोळे मिठुन उभी होती तिला फक्त त

सायकल वाला....

सायकल वाला.... भाग १           झग्याचा घोळ दोन्ही हातांनी सावरत पटापटा ती पायऱ्या उतरून खाली आली... दारात लावलेल्या स्कूटर वर थोडी धूळ जमली होती...जोरात फुंकर मारून धुळीचा पापुद्रा हटवला चावी लावून स्टार्टर मारला... फूरररर... डुग डुग डुग...ड र्रर्रर्र फूरररर... डुग डुग डुग...ड र्रर्रर्रर्र फूररररररर... डुग डुग..ड र्रर्रर्र र्रर्रर्रर्र. काही केल्या ही बया चालू होईना... आधीच झगा घालताना गडबड झाली होती... त्यात अर्ध्या तासाने उशीर झाला.. तिकडे स्टेज सजून बाकीचे कलाकार स्टेज वर असतील न....मी इकडे... ह्या विचाराने तिला मेल्याहून मेल्यासारखं होत होतं... आता पूजा टोमणे देणार... अगोदरच तिने नाट लावला होता -"जुलियेट" चा मेन रोल हिला देऊ नका म्हणून, ही मधेच घोळ घालेल... पूजा ला आटवून तर तिला रडायलाच आलं.... तशीच त्या स्कूटर ला एक जोरात लात मारली न पुन्हा झग्याचा घोळ दोन्ही हातांनी सावरत... मुख्य रस्त्यावर आली... आता बस रिक्षा टॅक्सी जे मिळेल त्याने जायची तिची तयारी होती प्रसंगी बैलगाडी ने जाईन पण लवकरात लवकर जायचंय... नाहीतर पूजा तयारीतच होती "जुलीयेट"