सायकल वाला....

सायकल वाला....
भाग १
     
    झग्याचा घोळ दोन्ही हातांनी सावरत पटापटा ती पायऱ्या उतरून खाली आली...
दारात लावलेल्या स्कूटर वर थोडी धूळ जमली होती...जोरात फुंकर मारून धुळीचा पापुद्रा हटवला
चावी लावून स्टार्टर मारला...
फूरररर... डुग डुग डुग...ड र्रर्रर्र
फूरररर... डुग डुग डुग...ड र्रर्रर्रर्र
फूररररररर... डुग डुग..ड र्रर्रर्र र्रर्रर्रर्र.
काही केल्या ही बया चालू होईना...
आधीच झगा घालताना गडबड झाली होती...
त्यात अर्ध्या तासाने उशीर झाला..
तिकडे स्टेज सजून बाकीचे कलाकार स्टेज वर असतील न....मी इकडे...
ह्या विचाराने तिला मेल्याहून मेल्यासारखं होत होतं...
आता पूजा टोमणे देणार...
अगोदरच तिने नाट लावला होता -"जुलियेट" चा मेन रोल हिला देऊ नका म्हणून, ही मधेच घोळ घालेल...
पूजा ला आटवून तर तिला रडायलाच आलं....
तशीच त्या स्कूटर ला एक जोरात लात मारली
न पुन्हा झग्याचा घोळ दोन्ही हातांनी सावरत...
मुख्य रस्त्यावर आली...
आता बस रिक्षा टॅक्सी जे मिळेल त्याने जायची तिची तयारी होती
प्रसंगी बैलगाडी ने जाईन पण लवकरात लवकर जायचंय...
नाहीतर पूजा तयारीतच होती "जुलीयेट" बनायला...
सकाळची वेळ म्हणजे
बस
काय रिक्षा टॅक्सी...
मनात आणल्या सारखी बैलगाडी पण येईना....
३ ४ जणांना लिफ्ट साठी हात हलवून अंगठा वर करून झाला होता....
झगा बघून की काय कोणी थांबायला तयारचं होईना....
आता तिला डोळ्यासमोर पूजा टोमणे न  जुलीयेट चा रोल करणारी पूजा दिसू लागली...
तिला पोटात गोळा आला...
तिने क्षणभर विचार केला आता ५ मिनिटे वाट बघायची अन चालत कॉलेज गाठायचं जे होईल
ते होईल....
तिने पुन्हा सुरवात केली...
४ कार
६ मोटार बाईक
चक्क ३ टेम्पो गेले
२ बस तर इतक्या भरल्या होत्या की स्टॉप असून पण थांबल्या नाहीत...
दुष्काळात तेरावा...म्हणतात ते हेच का असं तिला वाटू लागलं..
आता शेवटची २ मिनिटे फक्त असा पक्का निर्धार करून समोरून येत असलेल्या कार ला हात केला...
झूप.....करून कार निघून गेली...
अरे यार शीट असा तावातावाने म्हणत ती चालू
लागली...
४ पावलं टाकल्यावर तिला मागून आवाज आला..
अहो मॅडम काय झालं लिफ्ट पाहिजे का??...
तिला इतका आनंद झाला....
तिने मागे वळून पाहिलं अन.....
एक २० २१ वर्षाचा तरुण उभा होता...
पांढरा शर्ट काळी पॅन्ट...
न काळे बूट...
चक्क सायकल घेऊन....
तिला थोडं विचित्र वाटलं....
""फॉर्मल कपडे न हातात सायकल??""
मग तिने मनात विचार केला
जाऊदे बाबा
अडला हरी.....
प्लीज प्लीज प्लीज..
आर के कॉलेज असं म्हणून काहीही न विचारता ती चक्क सायकल वर बसली...
तो फक्त बघत होता...
""ट्रिंग...ट्रिंग
अहो चला ना...आर के कॉलेज मला उशीर होतोय..
१५ मिनिटात माझा रोल आहे जुलियेट चा""
"""हा आर के कॉलेज ना ओके जाऊया.."""
त्याने सायकल मारायला सुरुवात केली...

"अहो जरा फास्ट चालवा ना....रोल आहे माझा...."
''उंम्म्म......येस मॅम"" असं म्हणत त्याने जोरात पॅडल मारायला सुरुवात केली...

तिच्या डोक्यात अजून
जुलियेट
पूजा
रोल
स्टेज
बस्स एवढंच चालत होत....
दर ५ १० सेकंदात
ती मनगटावर नजर मारत होती....

तो सायकल मारत मारत हलक्या नजरेने तिला पाहत होता...
तिचे केस
तिच्या कपाळावर भुरभुरणारी तिची एक बट
तिचा झगा
तिचा मध्यम बांधा
आणि
तिच्या कडून येणारा
हलकासा अत्तराचा सुवास....
हे कोणतं अत्तर असावं...
ह्याचा तो विचार करत असतानाच.....

"अहो अहो अहो....
माझं कॉलेज
कॉलेज.....
अरे मागे गेलं माझं कॉलेज....""
झटक्यात त्याला भान आलं...
न विचारातून बाहेर पडला....
""सॉरी सॉरी..मॅडम.माझं लक्ष नव्हतं""
त्याने सायकल फिरवली न

""हम्म्म उतरा आर के कॉलेज...""
ती झटकन उतरली...
"मंडळ आभारी आहे""
एक मिश्किल हास्य देऊन झर झर
निघाली...
तेवढ्यात त्याने हाक दिली...
""अहो मॅडम...एक सांगू...
सगळं ठीक आहे....पण""
""पण काय बोला लवकर ..""
ती जरा वैतागून बोलली
""पण कपाळावर एक लाल टिकली असती ना छोटुशी तर जरा...."""
असं म्हणून त्याने पॅडल मारलं न टांग टाकून मागे न पाहता झर कन निघून गेला...
""जुलियेट आणि टिकली...
हा हा हा...""
स्वतःशीच हसत...
ती आत गेली...

""काय यार किती वेळ तरी मी म्हटलं होतं तू घोळ घालनार..""
पूजा ची बोंब चालू झाली..

""सॉरी सॉरी...आग अचानक बया बिघडली...
तो सायकल वाला भेटला म्हणून नशीब...""
""कोण होता तो नाव काय त्याच??""

""अररर...नाव राहिलंच....""
"""असो लेट्स गो फॉर....रॉक""

तिच्या डोक्यात तेच चालू होतं...
""नाव काय होतं???""
""हम्मम सायकल वाला""
स्वतःची समजूत घालत तिने तात्पुरता तो विषय
टाळून नेला...

स्टेज वर जाताना स्वतःशीच मिश्कीलपणे हसत ती पुटपुटली...
""""हम्मम सायकल वाला""'

क्रमशः.....

©-श्रीकांत कुंभार

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 2